29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयबाळासाहेबांच्या नावाची निलेश राणेंना चिंता? उद्धव ठाकरेंना सुनावले खडे बोल

बाळासाहेबांच्या नावाची निलेश राणेंना चिंता? उद्धव ठाकरेंना सुनावले खडे बोल

टीम लय भारी

कणकवली : शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यामुळे शिवसेना खरी कोणाची अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. अनेकजण बंडामुळे एकनाथ शिंदेना कारणीभूत मानत आहेत तर कोणी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकतृत्वावर सवाल करीत त्यांनाच फैलावर घेत आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण दिवसेंदिवस आणखी तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांचे टीकेचे बोचरे बाण सुद्धा शिवसेनेवर आदळत आहेत.

यावेळी निलेश राणे यांनी खुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष करीत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सोशल मिडीयावर पोस्ट करीत राणे यांनी “बाळासाहेबांचे नाव पुरतं घालवलं” असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

ट्वीटमध्ये निलेश राणे लिहितात, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत 20 आमदार नाहीत पण ते कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांची उद्धव ठाकरेंना नेता मानायची इच्छा नाही ते त्याच पार्टीत राहून नेता का बदलू शकत नाही”, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे राणे लिहितात, “बाळासाहेबांचे नाव पुरतं घालवलं या उद्धव ठाकरेनी. सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली”, असे म्हणत शिवसेनेच्या नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.

राज्यात शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर नवी सत्ता स्थापन झाली, तर शिवसेनेचे दोन गट पडले. यामध्ये शिंदे गटाकडे मोठे संख्याबळ असल्यामुळे शिवसेनेची अवस्था अगदीच खिळखिळी झाली आहे, तरीसुद्धा मुळ शिवसेनेचा पाया वाचवण्यासाठी ठाकरे कुटुंबीय आणि इतर उरलेले शिवसेना पक्षनेते, शिवसैनिक यांच्याकडून पुरेपुर प्रयत्न करण्यात येत आहे.

पक्ष ओरबाडण्याच्या षडयंत्राला चाप बसवण्यालाठी उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबला असला तरीही सध्या ते चौफेर टीकेच्या वादळात सापडले आहेत.

हे सुद्धा वाचा…

सोनिया गांधी ईडीच्या शिकार? आज मुंबईसह देशभरात काॅंग्रेसची निदर्शने

आता ‘गुरुद्वाराला’ जाणे झाले सोपे

कल्याणमधील जखमी शिवसेना पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंनी केला फोन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी